Ad will apear here
Next
‘चित्रपटांमुळे भारत इस्रायल संबंध अधिक दृढ’
इस्रायलचे चित्रपट निर्माते डॅन वॉलमन यांचे मत
‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’तर्फे आयोजित इस्रायली चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी प्रा. अमिताव मलिक, लतिका पाडगांवकर, इस्रायलचे चित्रपट निर्माते डॅन वॉलमन,डेप्युटी काऊन्सल जनरल निमरोद काल्मार, प्रकाश मगदूम.

पुणे : ‘चित्रपट माध्यमातून भारत आणि इस्रायलमधील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ झाले आहेत’, असे मत इस्रायलचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि पटकथाकार डॅन वॉलमन यांनी व्यक्त केले. ‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’ तर्फे (पीआयसी) आयोजित करण्यात आलेल्या इस्रायली चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन डॅन वॉलमन यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. 

इस्रायली दूतवासातील डेप्युटी काऊन्सल जनरल निमरोद काल्मार, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, ‘पीआयसी’च्या कार्यक्रम समितीचे अध्यक्ष प्रा. अमिताव मलिक, समन्वयक लतिका पाडगांवकर या वेळी उपस्थित होते. 

डॅन वॉलमन
डॅन वॉलमन म्हणाले, ‘मी अनेक वर्षे भारतामध्ये येत असून, इथे एक छोटा चित्रपटही तयार केला आहे. भारत आणि इस्रायलमध्ये सांस्कृतिक आदानप्रदान सुरूच आहे. चित्रपट हे एक असे मध्यम आहे, की ज्यामुळे हे सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होतील.’

निमरोद काल्मार म्हणाले, ‘इस्रायली समाजातील अडचणी मांडण्याचे, सिनेमा हे एक शांततामय माध्यम आहे. भारतीय आणि इस्रायली सिनेमाने एकत्र काम करावे.’ 

प्रकाश मगदूम म्हणाले, ‘सिनेमा ही चित्रभाषा असून, त्याला कोणत्याही भाषेचे बंधन नसते, त्यामुळेच जग जवळ येते. अनेक इस्रायली चित्रपटांवर हिंदी सिनेमाचा प्रभाव आहे.’

प्रा. अमिताव मलिक म्हणाले, ‘शेजारील देशांतील चित्रपट आपल्या देशात दाखविले जावेत, त्यांची संस्कृती आपल्याला कळावी, त्याचे आदानप्रदान व्हावे या उद्देशाने ‘पीआयसी’ गेल्या काही वर्षांपासून चित्रपट महोत्सवाचे आयोजन करीत आहे.”

लतिका पाडगांवकर म्हणाल्या, ‘परंपरा, समाज, धर्म, राजकारण आणि व्यक्तींविषयी बोलणारे हे चित्रपट भारतासाठी इस्रायलचे दरवाजे उघडतात.’ 

उद्घाटनानंतर डॅन यांचा ‘अॅन इस्रायली लव्ह स्टोरी’ हा चित्रपट ओपनिंग फिल्म म्हणून दाखविण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लिसा पिंगळे यांनी केले. 

‘पीआयसी’च्या वतीने आयोजित होत असलेला हा सलग बारावा चित्रपट महोत्सव आहे. यापूर्वी ‘पीआयसी’च्या वतीने बांग्लादेश, अफगाणिस्तान, कझाकिस्तान, इराण, नेपाळ, श्रीलंका आदी देशांचे  चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आले होते. 

सात डिसेंबर ते नऊ डिसेंबरपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) येथे हा महोत्सव चालणार आहे. हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. यामध्ये ‘यानाज् फ्रेंडस्’, ‘स्ट्रेंजर्स’, ‘दि बॅण्डस् व्हिजीट’, ‘दि सिरीयन ब्राईड’, ‘लेमन ट्री’, ‘अॅन इस्रायली लव्ह स्टोरी’, ‘पासओव्हर फिव्हर’, ‘माय मायकल’, ‘फूटनोट’, ‘माय फादर, माय लॉर्ड’, ‘थर्स्ट’ या चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपटांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये नामांकने आणि पारितोषिके मिळाली आहेत. याशिवाय महोत्सवातील काही चित्रपट हे इस्रायलच्या वतीने ऑस्करमधील ‘बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म’ स्पर्धा विभागात अधिकृतपणे पाठविण्यात आले होते. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZVRBV
Similar Posts
महात्मा गांधींचे दुर्मीळ चित्रीकरण पाहण्याची संधी पुणे : महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त दोन ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात महात्मा गांधी यांचे दुर्मीळ चित्रीकरण दाखवण्यात येणार आहे.
‘पीआयसी’तर्फे इस्रायली चित्रपट महोत्सवाचे आयोजन पुणे : पुणे इंटरनॅशनल सेंटरने (पीआयसी) सहा ते नऊ डिसेंबर २०१८ या कालावधीत दरम्यान लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे इस्रायली चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘पीआयसी’तर्फे आयोजित हा सलग बारावा चित्रपट महोत्सव आहे. हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.
नृत्यविषयक ‘संचारी’ चित्रपट महोत्सवाचे आयोजन पुणे : नृत्यविषयक चित्रपट, लघुपट, माहितीपट यासह या क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधण्याची संधी येत्या शनिवारी,१६ फेब्रुवारी व रविवारी १७ फेब्रुवारी २०१९ रोजी पुणेकर रसिकांना मिळणार आहे. निमित्त आहे ‘कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि ‘लाउड अॅपलॉज डान्स मॅगझिन’ प्रस्तुत ‘संचारी’ या दोन दिवसीय नृत्यविषयक चित्रपट महोत्सवाचे
‘एनएफएआय’कडे महात्मा गांधी यांच्या दुर्मीळ चित्रफितींचा खजिना पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अस्थि विसर्जनासाठी घेऊन जाणाऱ्या मद्रास ते रामेश्वरम रेल्वेगाडीच्या प्रवासाचे चित्रीकरण, गांधीजींचा दक्षिण भारत दौरा, हरिजन यात्रा अशा अनेक ऐतिहासिक घटनांचे चित्रीकरण असलेल्या चित्रफितींचा दुर्मीळ खजिना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला (एनएफएआय) मिळाला आहे. महात्मा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language